मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारावे – स्वराज्य स्वाभिमानी संघटनेची मागणी
प्रतिनिधी मुल लोकवाद : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे संपूर्ण जीवन शौर्य, दूरदृष्टी व न्यायप्रियतेचे प्रतीक असून आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याची आठवण जनसामान्यांपर्यंत पोहोचावी तसेच त्यांना आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करता यावी, यासाठी स्मारकांची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे.
मुल शहरामध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणतेही भव्य स्मारक नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त करत स्वराज्य स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौं. एकताताई समर्थ व मुख्याधिकारी नगरपरिषद मुल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात प्रभाग क्रमांक ७ मधील तलावाच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात किंवा न्यायालयासमोरील शहीद स्मारकाच्या बाजूला असलेल्या नगर परिषदेच्या खुल्या जागेचा वापर करून अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मारकाच्या मागील व सभोवतालच्या परिसराला किल्ल्याच्या स्वरूपात सुशोभित करून विद्युत रोषणाईद्वारे आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून ते स्वराज्याच्या स्वप्नाची आणि महाराजांच्या आदर्शांची आठवण करून देणारे पवित्र स्थान ठरेल, असे संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले.
ही मागणी आकाश कावळे (अध्यक्ष, स्वराज्य स्वाभिमानी संघटना, मुल) व संदीपभाऊ मोहबे (उपाध्यक्ष, भाजपा मुल शहर) यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी टिंकू दुधे (युवासेना शहरप्रमुख, मुल), राकेश मोहुर्ले, चेतन मेकर्तीवार, सतीश वैरागडवार, दिवाकर झरकर, शुभम मुत्यलवार, मुन्ना कावळे, आकाश निकुरे, गणेश मंथनवार, आकाश मोहुर्ले, ज्ञानेश्वर मडावी आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारावे – स्वराज्य स्वाभिमानी संघटनेची मागणी
मुल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे संपूर्ण जीवन शौर्य, दूरदृष्टी व न्यायप्रियतेचे प्रतीक असून आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याची आठवण जनसामान्यांपर्यंत पोहोचावी तसेच त्यांना आदरांजली व श्रद्धांजली अर्पण करता यावी, यासाठी स्मारकांची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे.
मुल शहरामध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणतेही भव्य स्मारक नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त करत स्वराज्य स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौं. एकताताई समर्थ व मुख्याधिकारी नगरपरिषद मुल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात प्रभाग क्रमांक ७ मधील तलावाच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात किंवा न्यायालयासमोरील शहीद स्मारकाच्या बाजूला असलेल्या नगर परिषदेच्या खुल्या जागेचा वापर करून अश्वारूढ स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मारकाच्या मागील व सभोवतालच्या परिसराला किल्ल्याच्या स्वरूपात सुशोभित करून विद्युत रोषणाईद्वारे आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून ते स्वराज्याच्या स्वप्नाची आणि महाराजांच्या आदर्शांची आठवण करून देणारे पवित्र स्थान ठरेल, असे संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले.
ही मागणी आकाश कावळे (अध्यक्ष, स्वराज्य स्वाभिमानी संघटना, मुल) व संदीपभाऊ मोहबे (उपाध्यक्ष, भाजपा मुल शहर) यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी टिंकू दुधे (युवासेना शहरप्रमुख, मुल), राकेश मोहुर्ले, चेतन मेकर्तीवार, सतीश वैरागडवार, दिवाकर झरकर, शुभम मुत्यलवार, मुन्ना कावळे, आकाश निकुरे, गणेश मंथनवार, आकाश मोहुर्ले, ज्ञानेश्वर मडावी आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.