चामोर्शी: शेतकरी व शेतमजूर यांना गावातच रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( मनरेगा ) ही योजना सुरू होती मात्र केंद्रातील सरकारने या योजनेचा नाव बदलवून योजना बंद करण्याचा कुटील डाव करीत असून ही योजना पुर्ववत सुरू ठेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर , सुमेध तुरे ,विजय लाड ,कविता भगत , प्रेमानंद गोंगले,अमर मोगरे ,रवींद्र पाल ,सुशिन शहा ,निकेश गद्देवार, पिपलदास सोयाम, प्रियंका भगत ,हिवराज लाटकर ,रामदास कुकुडकार ,अजय गेडाम, मुक्तेश्वर कोंडेकर ,प्रशांत आत्राम ,अमर जवादे,देविदास मांडवकर ,महादेव जवादे,प्रफुल बारसागडे ,हेमंत कोवासे ,राहुल वैरागडे ,सुभाष कोठारे ,यासह काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी शेतमजूर,नागरिक उपस्थित होते.