HomeBreaking Newsभामरागड तालुक्यातील चकमकीत तीन माओवादी ठार, जवान शहीद

भामरागड तालुक्यातील चकमकीत तीन माओवादी ठार, जवान शहीद

ब्रेकिंग न्यूज….

भामरागड तालुक्यातील चकमकीत तीन माओवादी ठार, जवान शहीद

जखमी जवानावर उपचार सुरू

उपसंपादक गडचिरोली लोकवाद : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेकडील अबुझमाडच्या जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार चकमकीत तीन माओवादी ठार झाले असून एका पोलीस जवानाला वीरमरण आले आहे. याशिवाय एक जवान जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॅाप्टरने आणले जात आहे.

वीरमरण आलेल्या जवानाचे नाव दीपक चिन्ना मडावी (38 वर्ष) असे आहे. ते मुळचे दामरंचा जवळील मांड्रा या गावातील रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य अहेरी येथे होते. त्यांना अबुझमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॅाप्टरने भामरागडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अभियानादरम्यान पोलीस जवान जोडा मडावी (रा.किष्टयापल्ली) हे गोळी लागून जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत तीन माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक एके-47 रायफल आणि एक एसएलआर रायफल मिळाल्यामुळे ते वरिष्ठ कॅडरमधील माओवादी असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments