मूल नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष तथा नगर सेवक पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
शहर विकासासाठी एकदिलाने काम करणार असल्याचा सौ. एकता समर्थ व गटाचा निर्धार
लोकवाद मूल :— मूल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.एकता प्रशांत समर्थ यांचा व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ सोहळा सोमवार,5 जानेवारी रोजी मूल नगरपरीषेत कार्यालयात पार पाडला. यावेळी आायेाजित पदग्रहण समारंभ या कार्यक्रमात विकासासाठी कॉंग्रेस एकदिलाने काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या सोहळयाला निवडून आलेल्या मूलच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभझालेल्या नगराध्यक्ष एकता प्रशात समर्थ व गटनेते राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ यांचेसह १८ नगर सेवक, सेविका यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
प्रभाग १ चे नगरसेवक प्रशांत समर्थ, नगरसेविका काजल धारणे, प्रभाग २ चे तुकाराम गुरनुले, प्रभाग ३ चे शालू शेरकी, मिथुन गडेवार, प्रभाग ४ चे उज्वला कांमडी, प्रभाग ५ चे रितिक गोयल, प्रभाग ६ चे विवेक मुत्यलवार, नलिनी आडपवार, प्रभाग ७ चे अशोक येरमे, समीक्षा कडसकर, प्रभाग ८ चे अतुल गोवर्धन, ज्योती चटारे, प्रभाग ९ चे ललिता फुलझेले, विलास कागदेलवार, प्रभाग १० चे सुशीला खोब्रागडे, राहुल प्रेमलवार या सर्व नगर सेवक, सेवकांचा सीईओ दोडे यांनी सत्कार केला. जनतेनी दिलेला मतरुपी आशीर्वाद कुठलाही भेदभाव न करता मी आपले काम करून व विश्वास संपादन करुन पूर्ण करणार अशी शपथ नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी जनतेसमोर घेतल्या.
या प्रसंगी प्रशांत समर्थ यांनीही आम्हाला निवडून आणणारे विधान सभेचे गटनेते, माजी विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, कर्णधार व निवडणुकीचे शिल्पकार प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत, यांच्या नेतृत्वात आम्ही हा गड जिंकला असून दिलेला वचननामा आम्ही कामातून पूर्ण करणार असे मनोगत व्यक्त केले, तसेच गटनेते राकेश रत्नावार यांनीही मागील कार्यकाळात काय झालं हे सोडा, . आमच्या कार्यकालात आमचे नेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमचे मार्गदर्शक संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात न.प. कामासोबत आरोग्य, तहसील, फॉरेस्ट, भूमि अभिलेख, पंचायत समिती, इतर सर्व जनतेची कामे करण्यास प्राधान्य देणार अशी ग्वाही दिली. याप्रसंगी नगरसेविका लीना फुलझेले, अशोक येरमे यांनीही मनोगत व्यक्त करून जनतेचे आभार मानले.
मंचावर नगराध्यक्ष,गटनेते, सर्व नगरसेवक व समस्त जनतेला संविधान फलकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व संविधानाचे वाचन अधीक्षक विनोद येनुरकर यांनी केले. आभार रामटेके यांनी मानले.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा व नगर सेवक यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विजय चिंमड्यालवार, सुनीता बुटले, रीना थेरकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, राजूपा. मारकवार, युवक अध्यक्ष पवन निलमवार, रुपाली संतोषवार, प्रतिष्ठित व्यापारी दिनेश गोयल, हिरेन शहा, बाबा अजिम, अमोल बच्चूवार, नितीन राजा, रुपेश मारकवार, सुरेश फुलझेले, नितीन येरोजवार, सचिन चिंतावार, सौरभ वाढई, किशोर गोगुलवार, संजय चिंतावर, राजू मार्तीवार, मॉर्निंग ग्रूपचे सर्व सदस्य, माजी नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचारी, व असंख्य मतदार नागरिक उपस्थित होते.
आदी मंचावर उपस्थित होते. प्रमूख नेत्यंानी आपल्या भाषणातून कार्यकत्याना आणि जनतेला आश्वस्त केले. ध्येयधोरणानुसारच मूल शहरासाठी विकासकार्य करू,शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.असे आश्वासन उपस्थित पाहूण्यांनी दिले.जनतेच्या समस्या थेट सोडवण्यासाठी ग्वाही या प्रसंगी दिली.







