Homeचंद्रपूरराकेश रत्नावार यांना जिल्ह्यात पाचव्यांदा उपाध्यक्ष पदाचा बहुमान

राकेश रत्नावार यांना जिल्ह्यात पाचव्यांदा उपाध्यक्ष पदाचा बहुमान

राकेश रत्नावार यांना जिल्ह्यात पाचव्यांदा उपाध्यक्ष पदाचा बहुमान

प्रतिनिधी लोकवाद मूल ; पदावर असो अथवा नसो, सतत वर्षभर जनतेच्या  सेवेत कार्यरत राहणारे,गरिबांच्या आरोग्यासाठी धाऊन जाणारे सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सतत कार्यशील असलेले राकेशभाऊ रत्नावार हे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले तेंव्हाच त्यांना उपजतचं नेतृत्वगुण लाभले. राकेशभाऊंना गरीबीची जाणीव असून लोकसेवेसोबतच रूग्णसेवेला प्राधान्य देतात त्यामुळे  बहुजन समाजातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन मोठया आशेने पाहते आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्यात युवा अवस्थेतच नेतृत्व गुण पहायला मिळाले. वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश घेतलेल्या राकेशभाऊंनी ज्या मातीमध्ये जन्मलो, त्याच मातीशी नाळ जोडून ठेवत समाजसेवेचे व्रत स्वीकारून धाडसी वृत्तीने निराधार व निराश्रीत जनतेला न्याय देण्यासाठी सदैव कार्यतत्पर असलेल्या राकेशभाऊंनी शेकडो मित्रांचा गोतावळा निर्माण केला. जनसेवक म्हणून नावारूपास आलेल्या राकेशभाऊंनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी जिव्हाळयाचे नाते जोपासले. त्यामुळे हाती घेतलेले काम यशस्वी करण्याची सचोटी त्यांनी उत्तमप्रकारे आत्मसात केली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी मूल नगर परिषद निवडणुकीत अपक्ष नगर सेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. अत्यंत कमी वयात नगरसेवक होणारे युवा नेतृत्व म्हणून राकेशभाऊ सर्वपरिचीत आहेत.                    सदस्यपदाच्या कार्यकाळात चाणक्य नितीचा वापर करून सलग ५ वर्ष नगर परिषदेचे बांधकाम सभापतीपद भुषविले. राकेशभाऊ राजकारणातले सदैव यशस्वी, उमदे नेतृत्व असून आजही ते मागे वळले नाही.

प्रदेश काँग्रेसचे महासचिव, स्थानिक काँग्रेस नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना बंधूस्थानी मानून त्यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा काँग्रेसपक्षातून विजयी झाले व अडीच वर्ष न.प. उपाध्यक्ष पदी विराजमान झाले. परत तिसऱ्यांदा सुद्धा न.प. वर निवडून येऊन पुन्हा उपाध्यक्ष पद खेचून आणला. एवढेच नव्हेतर आपला स्वतःचा वॉर्ड व प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात स्वतः निवडून येऊन आपल्यासोबत इतरांनाही निवडून आणण्याची किमया रत्नावर यांनी केली आहे. काँग्रेस नेते,माजी विरोधी पक्ष नेते, विधान मंडळाचे गट नेते मान. विजय वडेट्टीवार, व जिल्ह्याचे खासदार मान.प्रतिभाताई धानोरकर, व स्थानिक नेते प्रदेश काँग्रेसचे महासचिव, माजी जी.प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात मूल नगर परिषद स्पष्ट बहुमतात आल्यानंतर पुन्हा राकेश रत्नावार यांची गटनेते पदी निवड होऊन पाचव्यांदा उपाध्यक्षांचा मान मिळाला आहे.                                           राजकीय क्षेत्रासोबत सहकार क्षेत्रातही राकेशभाऊ आघाडीवर आहेत  वयाच्या २४ व्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निर्वाचित झाल्यानंतर सलग १० वर्ष पासून आजही  त्यांनी बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत.  सहकार क्षेत्रात सक्रिय असलेले राकेशभाऊ मूल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि आदर्श शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कार्यशील आहेत. राकेशभाऊकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी न्याय देण्याची महत्वाची कामगिरी बजावत आहेत. शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना तालुक्यातील शेकडो रंजल्या, गांजल्या, गरीब, निराश्रीत, निराधार वृध्दांना शासकीय योजनेचा लाभमिळवून दिले आहेत. बाजार समिती आवारात शेतकऱ्यांसाठी मोफत राहण्याची सोय, शेतमालाला योग्य भाव, हजारो शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी झटत आहेत. ते आजही जनतेच्या मना- मनात असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments