ग्रामीण भागातील ग्राहकांचे शोषण थांबविण्यासाठी ग्राहक जागृती आवश्यक: चर्चासत्रातील सूर
प्रतिनिधी लोकवाद मूल ; असून आम्ही कुणाच्या विरोधात नाही परंतू शोषण कोणत्याही प्रकारचे असले तरी ते खपवून घेतले जाणार नाही यासाठी तालुका प्रशासनाने आवश्यक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती ची कारणमीमांसा करावी व त्यांचेवर उचीत कार्यवाही करावी कारण या कार्यक्रमात ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली जाते, आणि शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिकांना एका कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे हेही शोषणच असून ग्राहकांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असेल तर त्याची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जाते आणि ते नागरिकांना उपलब्ध असणे हेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व अशा कार्यक्रमातून याबाबत सविस्तर माहिती दिली जाते व ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाही अशाप्रकारची जनजागृती होत असते आणि म्हणूनच याबाबत जागरूकता निर्माण करणे ,जनतेचा सहभाग वाढविणे आवश्यक झाले आहे असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सरपंच जितेंद्र लोणारे यांनी वजनमापांतील तफावत व ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जाते गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आणि वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे व जनतेला व ग्राहकांना वेळीच माहिती पुरवावी जे कधी घडतच नाही असे स्पष्ट करीत आपल्या अधिकारांसाठी मान्यवरांच्या विचारांशी सहमत असून जनतेच्या जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले, ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक टिकले यांनी सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.







