Homeगडचिरोलीएमपीएससीत(MPSC) रोहित पाल यांचे घवघवीत यश; काँग्रेस व सामाजिक संघटनांकडून सत्कार

एमपीएससीत(MPSC) रोहित पाल यांचे घवघवीत यश; काँग्रेस व सामाजिक संघटनांकडून सत्कार

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी :(प्रतिनिधी)
चामोर्शी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे ज्येष्ठ सदस्य रविंद्रभाऊ पाल (रा. ठाकूरनगर) यांचे सुपुत्र रोहित रविंद्र पाल यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे त्यांनी आपल्या आई-वडिलांसह गाव व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
या यशाबद्दल काँग्रेस पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रोहित पाल यांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायत बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार, काँग्रेस मीडिया प्रमुख विजय लाड, वॉईस मीडिया प्रतिनिधी धनराज वासेकर आदी मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रोहित पाल यांचा गौरव केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोहित पाल यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोहित पाल यांचे यश हे तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments