मुल शहरातील भाजपाच्या चार दिग्गजाचा मोठया फरकाने पराभव
प्रतिनिधी मूल लोकवाद; मुल नगरपरिषद निवडणूकीचा निकाल लागताच भाजपावर चिंतनाची वेळ आली असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या १५ वर्षापासूनच्या नगरपालिकेवर असलेल्या सत्तेला सुरुंग लावत काँग्रेसने झेंडा फडकवाला. यामुळे विकासाला जनतेनी नाकारले की, नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जनतेनी नाकारले ह्याच्या चर्चा जनतेत झडत आहेत. यात मुल शहरातील भाजपच्या चार दिगज्जाना मोठया मताच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
नगरपरिषद निवडणुकाचे निकाल लागताच विजयी उमेदवारानी आनंदउत्सव साजरा करणे चालू केले तर पराभूत उमेदवारानी पराभवाची कारणीमिमासा करणे सुरु केले आहे. यात काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले तर भाजपावर चिंतनाची वेळ आली आहे. भाजपच्या पराभवासाठी कोण कोण कोणते फॅक्टरनी काम केले यांचे चिंतन भाजपा करेलच पण सुरवातीपासून भाजपा मध्ये उफाळून आलेली गटबाजी याला कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे.
मुल शहरातील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यापैकी प्रभाग एक मधून अजय गोगुलवार यांचा ४९८ मताने तर नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांचा ४०४ मताने पराभव झाला. स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्षा पदाची उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत आग्रही असलेले प्रशांत बोबाठे यांचा ५४३ मताने पराभव झाला. नगरपरिषदचे माजी सभापती अनिल साखरकर यांचा ५१० मताने पराभव झाला. भाजपचे शहर उपाध्यक्ष गुरु भेंडारे याच्या पत्नीलाही मोठया पराभवास समोर जावे लागले आहे. त्याचाही ४५५ मतांनी पराभव झाला. भाजपाचे दिग्गज निवडणुकीत आपटल्यामुळे, मागील पंधरा वर्ष सतत सत्तेत असलेल्या भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले







