HomeBreaking Newsशेकडो जीव वाचवणारी देवदूत रुग्णवाहिका जळून खाक; डोटकुली–वाघोली परिसरात शोककळा

शेकडो जीव वाचवणारी देवदूत रुग्णवाहिका जळून खाक; डोटकुली–वाघोली परिसरात शोककळा

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072
चामोर्शी (प्रतिनिधी)

पंचायत समिती सदस्य प्रमोद  भगत आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई प्रमोद भगत यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका आज दुर्दैवी घटनेत पूर्णतः जळून खाक झाली. हीच रुग्णवाहिका गेल्या अनेक वर्षांत शेकडो रुग्णांसाठी देवदूत ठरली होती.
नागपूर, सेवाग्रामसह विविध नामांकित रुग्णालयांमध्ये एकही पैसा न घेता रुग्णांना वेळेत पोहोचवून उपचार मिळवून देण्याचे मोलाचे कार्य या रुग्णवाहिकेमार्फत करण्यात आले. दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता ही रुग्णवाहिका जनतेच्या सुख-दुःखात धावत राहिली आणि अनेकांचे प्राण वाचवले.
वाघोली येथील रुग्णाला आणण्यासाठी जात असताना डोटकुली व वाघोली दरम्यान अचानक रुग्णवाहिकेला आग लागली. वाहनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली. सुदैवाने त्या वेळी रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली, मात्र काही क्षणांतच संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नव्हते, तर ग्रामीण भागातील गरिबांसाठी आशेचा आधार होते. प्रमोद  भगत व कविताताई भगत यांनी आपल्या कार्यकाळात ही सेवा अखंड सुरू ठेवत समाजसेवेचा आदर्श घालून दिला. आज तीच रुग्णवाहिका नष्ट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
डोटकुली, वाघोलीसह संपूर्ण परिसरात या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, “शेकडो जीव वाचवणारी आमची रुग्णवाहिका आज हरपली,” अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता जनतेतून होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments