*अस्वलीच्या हल्ल्यात जखमी सुरेश कुनघाडकर यांना माजी मंत्री तथा आम.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आर्थिक मदतीचे आधार..*
ग्राम.पंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार व गणेश दुधबळे तथा ग्रामवासियानी केली आर्थिक मदतीची मागणी..!
प्रतिनिधी मूल, चिचाळा येथील दिनांक १७/१२/२०२५ चे मध्य रात्री अस्वलीने गावात शिरून हैदोस घालत गुराखी सुरेश काशीनाथ कुणघाडकर यांचे वर हल्ला चढवून गंभीर जखमी केल,सुरेश कुनघाडकर यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांचेवर नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालय येथे उपचार सुरू आहे,ही बाब मान आम.सुधीर भाऊ मुनगंटीवार याना ग्रामस्थानी उथळपेठ येथे कार्यक्रमात निवेदन देऊन सांगण्यात आले,भाऊंनी लगेच वनविभाग यांचेशी संपर्क साधून ५ लाख रु येवढी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व स्वतः कडून ही मदत देणार असे जाहीर पने बोलले.यावेळी पालिंदर सातपुते सरपंच उथळपेठ यांचे प्रमुख उपस्थिती होती, *निवेदन देताना ग्रा.पंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार,गणेश दुधबळे,सुनील दुधबळें,विजय ढोडरे,वासुदेव बुरांडे,टिकू दुधे,साईनाथ दुधबळे,मनोहर बुरांडे,प्रकाश कुनघाडकर उपस्थित होते*







