HomeBreaking Newsघरात घुसून अस्वलीचा हल्ला; वनविभागाने तातडीची कार्यवाही करावी – सामाजिक कार्यकर्ते प्रविण...

घरात घुसून अस्वलीचा हल्ला; वनविभागाने तातडीची कार्यवाही करावी – सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे

*घरात घुसून अस्वलीचा हल्ला; वनविभागाने तातडीची कार्यवाही करावी – सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे*

लोकवाद प्रतिनिधी  मुल: ग्राम चिचाळा येथे दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 ते 1.00 वाजताच्या सुमारास अस्वलीने थेट वस्ती भागातील एका घरात प्रवेश करून हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात श्री. सुरेश काशिनाथ कुणघाडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना ही सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, वस्ती भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा ठरत आहे. घरातच घुसून झालेला हा हल्ला प्रशासनासाठी चिंताजनक बाब असल्याचे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे यांनी क्षेत्रीय वन अधिकारी, चिंचपल्ली वनपरिक्षेत्र यांच्याकडे निवेदन सादर करून, वस्ती भागात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची, संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्याची, तसेच अस्वली हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकास शासनाच्या नियमांनुसार नुकसान भरपाई मंजूर करून अदा करण्याची मागणी केली आहे.

तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वस्ती भागात देखरेख व्यवस्था अधिक मजबूत करण्याची व सदर प्रकरणाची अधिकृत नोंद घेऊन करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती ग्रामपंचायत व ग्रामस्थांना लेखी स्वरूपात देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments