HomeBreaking Newsनिर्णय विकासाचा… आणि भविष्य मुलचे..! किरण कापगते यांचा झंझावाती प्रचार

निर्णय विकासाचा… आणि भविष्य मुलचे..! किरण कापगते यांचा झंझावाती प्रचार

निर्णय विकासाचा… आणि भविष्य मुलचे..! किरण कापगते यांचा झंझावाती प्रचार

प्रतिनिधी मूल

मुल नगरपरिषद निवडणुकीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुलच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेल्या ‘प्रगतीचा वचननामा’ चे उद्घाटन माझ्या हस्ते करताना मनापासून समाधान आणि अभिमान वाटला. गांधी चौकातील जाहीर सभेला मुलवासीयांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक उपस्थितीने विजयाची खात्री आजच मिळाली आहे. हा केवळ कार्यक्रम नव्हता… तर मुलच्या उज्ज्वल भवितव्याचा ठाम निर्धार होता.

कोणत्याही खोट्या आश्वासनांना वा भावनिक भूलथापांना बळी न पडता, मुलच्या खऱ्या विकासासाठी मतदान करा. आपल्या डोळ्यांसमोर झालेली कामे, मुलचे बदललेले स्वरूप आणि निर्माण झालेल्या सुविधा हा खरा आधार आहे निर्णयाचा. त्यामुळे आपले अमूल्य मत विचारपूर्वक, जबाबदारीने आणि विकासाच्या दृष्टीने वापरा, असे ठाम आवाहन यावेळी केले.

मुलच्या विकासाचा हा प्रवास केवळ शब्दांवर नाही तर ठोस कामांवर उभा आहे. मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण, आकर्षक इको पार्क, अत्याधुनिक स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, व्यायाम शाळा, पत्रकार भवन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार, सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी, पॉलिटेक्निक कॉलेज मंजूरी, नवीन पोलिस स्टेशन, ओव्हरब्रिज, पट्टे वितरण उपक्रम, रेस्ट हाऊस आणि योगाभवन या सर्व प्रकल्पांमुळे मुलच्या प्रगतीचा पाया अधिक भक्कम झाला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments