Homeचंद्रपूरशिवसेनेच्या वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवत युवकांचा युवासेनात प्रवेश

शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवत युवकांचा युवासेनात प्रवेश

शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवत युवकांचा युवासेनात प्रवेश 

शैलेश केलझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू गट्टूवार यांच्या नेतृत्वात प्रवेश 

चंद्रपूर प्रतिनिधी लोकवाद : जिल्हा युवा सेना प्रमुखांच्या कार्यावर विश्वास ठेवत तरुणाचा सेनेच्या पक्षात प्रवेश करण्याचा शील शीला चालू असून शहरात आयोजित प्रवेश कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटातील वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवत अनेक तरुणांनी युवासेनात प्रवेश केला आहे.

सदर कार्यक्रम युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केलझरकर यांच्या मार्गदर्शनात आणि लोकसभा संघटक नंदू गट्टूवार यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश म्हहले, युवासेना विधानसभा अध्यक्ष विशाल कवणे, युवासेना शहर प्रमुख पवन यादव, वैद्यकीय जिल्हाप्रमुख चेतन उजवणे, तसेच युवासेना शहर समन्वयक अंकुश कोटरी उपस्थित होते.

त्यावेळी ओंकार वर्गंटीवार यांची युवासेना चंद्रपूर उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर आर्यन कुलमेथे, मुकुल तामले, अनुज भसारकर, प्रशिक खोब्रागडे, सिप्टीम शेख, संघर्ष मारे, मंथन संतोषवार, आर्यन खंडारे, राज खंडारे, दक्ष डहाट, आदित्य येणप्रेड्डीवार, ओम येणप्रेड्डीवार, पीयूष कस्तुरवार, गोलू येणप्रेड्डीवार आणि सुमित यांनी युवासेनात प्रवेश घेतला.

नव्या तरुणांच्या सहभागामुळे शहरातील युवासेनेचे संघटन अधिक सक्षम झाले असून पक्षविस्ताराला नवचैतन्य प्राप्त झाले आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments