शिवराया क्रीडा मंडळ टेकाडी तर्फे आयोजित भव्य कब्बडी सामान्यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्यां सौं. सरिताताई मंगेश पोटवार तर उदघाटक म्हनुन भाजपाचे जेष्ठ नेते प्रभाकर भोयर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, टेकाडीचे सरपंच सतीश पा. चौधरी, अनिल पा. बोमनवार, प्रमोद पा. बोमनवार, वंनरक्षक बोनलवार साहेब, आनंदरावं गोहने, हरिदास गोहने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक आणि संचालन विनोद गोहने यांनी केले. यावेळी सोनालीताई पोटवार यांनी अध्यक्षीय भाषांनातून युवकांनी चुकीच्या कामात वेळ न घालवता आपला फावला वेळ शारीरिक कवायत होईल अशा खेळात घालवण्याचा सल्ला दिला.कारण मानवी जिवनात खेळ हा जिवंनातील अविभाज्य भाग आहे. यावेळी शिवराया क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.