मुल नगर परिषद निवडणूक : भाजपकडून प्रा. डॉ. किरण कापगते-बोरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थितीत
मुल प्रतिनिधी : नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून नगराध्यक्ष पदासाठी प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. कापगते-बोरकर यांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
नामनिर्देशन दाखल कार्यक्रमाला भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सौ. वंदना शेंडे, माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर, सौ. उषाताई शेंडे, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, नंदकिशोर रणदिवे, मोतीलाल टहलीयानी, अविनाश जगताप, तालुकाध्यक्ष चंदू मारगोनवार, शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, वंदना आगरकाटे, महिला शहराध्यक्ष मनीषा गाडलेवार, चंद्रकांत आष्टनकर, युवा अध्यक्ष सोनू लाडवे, सर्व नगरसेवक आणि उमेदवार यांचा समावेश होता.
प्रा. डॉ. किरण कापगते-बोरकर यांच्या उमेदवारीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीत पक्ष शक्तीपूर्वक मैदानात उतरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.







