HomeBreaking Newsप्रभाग क्रमांक ८ मध्ये मिलिंद खोब्रागडे उत्तम उमेदवार

प्रभाग क्रमांक ८ मध्ये मिलिंद खोब्रागडे उत्तम उमेदवार

मुल प्रभाग क्रमांक ८ मध्ये मिलिंद खोब्रागडे उत्तम उमेदवार

प्रतिनिधी मूल गौतम जीवने; सद्या मुल नगर परिषद चे निवडणूक वारे जोरदार सुरू आहे. यात काँग्रेस भाजपा सेना आदी विविध पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. काही जुने तर अनेक ठिकाणी नवे चेहरे नगराधक्ष व  नगर सेवक पदाकरीता इच्छुक आहेत. पक्षांकडे उमेदवारी करिता दावा असला तरी तरी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असतानाही अनेक उमेदवारांचे फॉर्म आले नसल्याने. पक्षश्रेष्ठीचे निर्णयाकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. परंतु जनता मात्र योग्य उमेदवार कोण यावर जोर देणार असून प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी मागत असलेले मिलिंद खोब्रागडे यांना जनतेची तीव्र पसंती असल्याचे दिसून येते त्यांच्या सामाजिक कार्याबाबत सर्वांना माहिती असून त्यांच्या उत्तम स्वभाव आणि शहरातील नागरिकांच्या छोट्या मोठ्यांच्या कामाबाबत तळमळ असलेली नागरिकांना जाण आहे.

त्यांनी अनेकदा नगर सेवक म्हणून म्हणून निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना नागर परिषदेतील कामकाजाच दांडगा अनुभव असून जण सामानाच्या समस्येची जाण आहे. वॉर्ड नव्हे तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या ते त्यांच्या चांगल्या कार्याने स्वभावाने परिचित आहेत. त्यामुळे जनतेत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पक्षांनी संधी दिल्यास सोन करू असे उद्गारही त्यांच्या तोंडून निघत आहेत.

मूल शहरातील प्रख्यात समाजसेवक आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेले मिलिंदभाऊ खोब्रागडे यांनी नगर परिषद प्रभाग क्र. ८ मधून भाजपा पक्षाकडून आपली दावेदारी जाहीर केली असून या घोषणेनंतर प्रभागात मोठी राजनीतिक चळवळ जाणवू लागली आहे.

मिलिंद खोब्रागडे हे गेली अनेक वर्षे नगर परिषदेत नगर सेवक म्हणून निवडून आलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि मानवीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरातील लोकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. गरजूंच्या मदतीला एका हाकेला धावून जाणारे, समस्या सोडवण्यासाठी आघाडी घेत काम करणारे व खास म्हणजे सर्वांना उपलब्ध राहून कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments