गौतम जीवने प्रतिनिधी मूल
मूल::- मुल शहरातील प्रख्यात समाजसेवक आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेले अतुल रवी गोवर्धन यांनी नगर परिषद प्रभाग क्र. ८ मधून काँग्रेस पक्षाकडून आपली दावेदारी जाहीर केली असून या घोषणेनंतर प्रभागात मोठी राजनीतिक चळवळ जाणवू लागली आहे.
अतुल गोवर्धन हे गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि मानवीय कार्यात सक्रिय असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. गरजूंच्या मदतीला प्रथम धावून जाणारे, समस्या सोडवण्यासाठी आघाडी घेत काम करणारे व सर्वांना उपलब्ध राहणारे कार्यकर्ते म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या दावेदारीला कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रभागातील मोठ्या प्रमाणातील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून यामुळे विरोधकांमध्ये स्पष्टपणे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग ८ मध्ये विरोधात कोणताही उमेदवार उभा असो, “अतुल गोवर्धन यांचा विजय निश्चित” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून निवडणूक प्रचाराची हवा त्यांच्या बाजूने वाहताना दिसत आहे.
स्थानिक पातळीवर सेवा, संपर्क, आणि विश्वसनीयतेच्या बळावर अतुल गोवर्धन यांनी प्रभाग ८ मध्ये मजबूत पकड निर्माण केली असून काँग्रेसच्या बाजूने उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी कायम राहणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.