विदर्भाची काशी म्हणून देशात सर्वत्र बहुचर्चित असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे MSRDC विभागाकडून सोंदीर्यकरणचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. मात्र सदर काम अनेक नियमन बगल देत चालू असून फलकाविना कामाने मार्कंडा देव येथील कामाविषयी गावाशीयात संभ्रम निर्माण होत आहे.
MSRDCच्या मुख्य प्रवेशद्वारावर खोदकाम करून मोठे खड्डे तयार झाले धोकादायक खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कंत्राटदार मनमानीपणे कामे सुरू ठेवत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी ही मुजोरी पाहता, एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण धरणार? असा संतप्त प्रश्न आता मार्कंडा येथील नागरिक विचारत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ मार्कंडा देव येथे MSRDC अंतर्गत असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर सौंदर्य करणासाठी मोठे मोठे विहिरी सारखे खोल खड्डे खोदून ठेवल्यामुळे नागरिकास व भविकास ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहे, या खड्ड्यांमुळे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दररोज शेकडो वाहने या मार्गावरून ये-जा करतात. खड्ड्यांची खोली जास्त असून वाहनांच्या अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे. स्थानिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे व कंत्राटदाराकडे दुरुस्तीची मागणी केली मात्र अद्यापही तातडीने काम सुरू करण्यात आलेले नाही.
मार्कंडा देव हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित मार्ग ही प्राथमिक गरज आहे. MSRDC प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.