मुल शहराकरिता ब्रेकिंग न्यूज
,,,,,,अखेर काँग्रेस पक्षातील गुलदस्त्यात असलेला नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला ?
भाजपाचे माजी सभापती प्रशांत भाऊ समर्थ यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
राजकीय वातावरणात होणार मोठा बदल
आता लक्ष भाजपा उमेदवाराकडे ?
मुल लोकवाद ; मुल शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, एकीकडे भाजपचे अनेक उमेदवार नगराधक्ष व नगर सेवकां करिता फिल्डिंग लावत आहेत. यात काही नवे तर काही जुने उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा उमेदवार गुलदस्त्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आता सदर चर्चेला पूर्ण विराम मिळत असल्याचे दिसत असून मुल नगर परिषदेचे बहुचर्चित माजी बांधकाम सभापती प्रशांतभाऊ समर्थ सहापत्नीक अनेक कार्यकर्ता सह भाजपला राम राम ठोकून ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कार्यावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठीचा तिढा सुटण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे मुल शहरातील होऊ घातलेल्या नगर परिषद अध्यक्ष पदा करिता आता नवे वळण मिळणार असून रंगत मोठी आणि चुरशीची होणार आहे. परंतु काँग्रेस पक्षातून प्रशांतभाऊ समर्थ यांना उमेदवारी देण्यात आली तरी भाजपाचे अनेक उमेदवार नगराधक्ष पदाकरीता इच्छुक असल्याने नेमकी माळ कुणाच्या गळ्यात पडते. यावरून राजकीय जाणकारांच्या मते मोठा गणित लागणार आहे. अशी चर्चा आता मुल शहरात चालू आहे.







