Homeगडचिरोलीअंगारा गावात तीन दिवसांपासून नेटवर्क बंद — नागरिक त्रस्त, प्रशासन बेफिकीर.

अंगारा गावात तीन दिवसांपासून नेटवर्क बंद — नागरिक त्रस्त, प्रशासन बेफिकीर.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

अंगाऱ्यात नेटवर्क ठप्प; दैनंदिन जीवन विस्कळीत, व्यवस्थापन ठप्प
सिग्नलशिवाय अंगारा गाव अंधारात — तक्रारींवरही प्रशासन मौन

 

कुरखेडा तालुक्यातील अंगारा गावात गेल्या तीन दिवसांपासून BSNL चा नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन व्यवहार, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय कामकाज तसेच संपर्क साधणे अशक्य बनले आहे.
या समस्येमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक वेळा नेटवर्क समस्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन सुस्त झोप घेत असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तातडीने नेटवर्क सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली असून, समस्या न सुटल्यास गावाकऱ्या मार्फत BSNL कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आझाद समाज पार्टी चे कुरखेडा तालुका अध्यक्ष सावन चिकराम यांनी दिली आहे
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments