Homeगडचिरोलीनिर्दोष कर्मचाऱ्यांच्या लढ्याला न्याय – सिरोंचा तहसीलदारावर निलंबनाचा बडगा!

निर्दोष कर्मचाऱ्यांच्या लढ्याला न्याय – सिरोंचा तहसीलदारावर निलंबनाचा बडगा!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

लहानांवर कारवाई, मोठ्यांना संरक्षण – अन्यायाचा खेळ उघड!

मोठ्यांचा बचाव, छोट्यांचा बळी – कारभाराचा मुखवटा फाटला!

 

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मददीकुंठ्ठा येथील कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू साठा प्रकरणाला अखेर नाट्यमय वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुरुवातीला कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारत तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते.
मात्र, “लहान कर्मचाऱ्यांनाच बळी का द्यायचा, मोठ्या अधिकाऱ्यांचे काय?” असा सवाल करत तलाठी संघटनेने धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी अधिक तीव्र केली आणि चौकशीदरम्यान अनेक नवीन बाबी उघडकीस आल्या.
विश्वसनीय सूत्रांनुसार, तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या कार्यकाळात हा वाळू साठा प्रकार उघडकीस आला असून, त्याबाबत पुरावे मिळाल्याने महसूल विभागाने ‘तडका-फडकी’ निर्णय घेत थेट निलंबन आदेश जारी केला!
या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि इतर जबाबदारांवरही कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments