भाजपाच्या किरणांची क्षितिज की काँग्रेसच्या एकताची भावना ?
मुल नगर परिषद निवडणुकीत प्रचाराचा झंझावात जोरदार
शहरातील नागरिकांचे लक्ष 3 तारखेच्या परीक्षेकडे
गौतम जीवने मूल , लोकवाद ; मागील काही दिवसांपासून मुल शहरात सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असून मुल नगर परिषदेच्या आगामी अध्यक्ष कोण याची उत्कंठा दिवसागणिक शिगेला पोहचत आहे,
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नामाप्र महिला असून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, बसपा ,वंचित, तर काही अपक्ष असा अनेक पक्षांनी नगर परिषद निवडणुकित अध्यक्ष व नगर सेवक पदाकरीता आपापले उमेदवार उभे केले असून आपापले भविष्य आजमावत आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील 15 वर्षात मुल शहराचा केलेला विकास आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुल शहरात मिळालेली लक्षणीय आघाडी यामुळे भारतीय जनता पक्षानी आपला गड कायम रहावा म्हणून डॉक्टर प्रा. किरणताई कापगते – बोरकर , यांची उमेदवारी निश्चित करून मुल शहराच्या विकासासाठी नवी किरण म्हणत जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेस पक्षाने एकताच बळ दाखविण्या करिता भाजपाचे माजी बांधकाम सभापती राहिलेले प्रशांत समर्थ यांना पक्षात प्रवेश देत अध्यक्ष पदाकरीता त्यांच्या पत्नी एकता समर्थ यांना उमेदवारी देत जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर दोन्ही पक्षाची मक्तेदारी काढता यावी म्हणून शिंदे सेनेच्या वतीने भारतीताई राखाडे, तर वंचित बसपा आदी मित्र पक्षाच्या वतीने वैशाली मद्रिवार – वाळके, व काही पक्ष , अपक्ष अशा अनेक उमेदवारांनी निवडून येण्याकरीता तयारीत लागले आहेत, व जो तो आपलाच नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येण्याची आशा व्यक्त करत तशी तयारी सुद्धा प्रचाराच्या माध्यमातून सुरू केलेली आहे.
त्यामुळे येणाऱ्या परीक्षेची दोन तारीख जवळच आली असल्याने शहरात चालू असलेली प्रचार स्थिती पाहता भाजपा व काँग्रेस या दोन मुख्य पक्षात मोठी चुरस होणार असल्याचे दिसून येते. यात नेमका कोणता पक्ष नगराधक्ष पदाचा झेंडा रोवणार कोणाता पक्ष किती नगरसेवक मुल नगर परिषदेत निवडून आणणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







