Homeगडचिरोलीमतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण 68 सदस्य जागांसाठी निवडणूक होणार असून यात जिल्ह्याभरातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक 43,513 मतदार असून, त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे. देसाईगंज नगर परिषदेत एकूण 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल. आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, जे 27 मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण 20 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

आरक्षण आणि महिला प्रतिनिधीत्व

या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण 68 सदस्यांपैकी तब्बल 35 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवर्गनिहाय राखीव जागांची माहिती: एकूण 68 जागांपैकी ३१ जागा सर्वसाधारण, १८ जागा नामाप्र (नामांकित मागास प्रवर्ग) साठी, 11 जागा अनुसूचित जाती आणि 8 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments