नगर परिषद निवडणूक जाहीर, मुल च्या नगराध्यक्ष कोण चित्र अस्पष्ट
काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुलदस्त्यात ?
गौतम जीवने मूल , लोकवाद ; मागील अनेक दिवसांपासून मुल शहरात चर्चाणा उधाण आले असून मुल नगर परिषदेच्या आगामी अध्यक्ष कोण याची उत्कंठा दिवसागणिक शिगेला पोहचत आहे, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नामाप्र महिला असून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे या पक्षांनी नगर परिषद निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील 15 वर्षात मुल शहराचा केलेला विकास आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुल शहरात मिळालेली लक्षणीय आघाडी यामुळे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी साठी अक्षरशः रीघ लागल्याची चर्चा आहे, काँग्रेस पक्षाने सुद्धा आपली तयारी चालवल्याची चर्चा असून काही पक्ष प्रवेश घेत त्यांनी पक्षात संजीवनी टाकण्याचा प्रयत्न केला, इतरही पक्ष तयारीत आहेत, अजीत पवार राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांनी युती करत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक युतीत लढवण्याची तयारी चालवली आहे
सध्यातरी भारतीय जनता पक्षा कडून प्रा किरण कापगते , माधुरी करकाड़े, विद्या बोबाटे, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, शिवानी आगडे यांच्या नावाची चर्चा असून काँग्रेस मात्र अजून ही आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवून आहे, फॉर्म भरण्याची तारीख 4 दिवसांवर आल्यानंतरही स्पष्टपणे कोणतेही नाव अजून समोर आले नाही, नगराध्यक्ष पदासाठी भाजप चे माजी नगर सेवक आपल्या पत्नीकरिता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत असल्याची व उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे, काँग्रेस शहराध्यक्ष सुनील शेरकी, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले यांनी पण आपापल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे मागणी केल्याची माहिती आहे, शिवसेना उबाठा पक्षाकडून सौ टीना ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सौ धारा मेश्राम, शिंदे गटाकडून सौ भारती राखडे यांची नावे समोर येत आहेत, लवकरच सर्व पक्षांची नावे समोर येणार असून येत्या काही दिवसात शहर निवडणुकीच्या चर्चांमध्ये न्हाहून निघणार आहे







