HomeBreaking Newsऐन दिवाळीत भेसळयुक्त तेल --अन्न व औषध विभागाने धाड टाकून केला ...

ऐन दिवाळीत भेसळयुक्त तेल –अन्न व औषध विभागाने धाड टाकून केला 22 लाखाचा साठा जप्त

ऐन दिवाळीत भेसळयुक्त तेल –अन्न व औषध विभागाने धाड टाकून केला  22 लाखाचा साठा जप्त

मूल येथे सारडा खाद्येतल रिफायनिंग कारखान्यावर धाड टाकून 22 लाखाचा भेसळयुक्त तेल जप्त.

चंद्रपूर लोकवाद : दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने मूल येथील सारडा खाद्येतल रिफायनिंग कारखान्यावर धाड टाकून सुमारे २२ लाख ६८ हजार ३६८ रुपये किमतीचा तब्बल १४ हजार २८ क्विंटल खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टिन व कमी दर्जाचे असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नफा दसरा, दिवाळी या सणाच्या कालावधीत अधिकच्या कमावण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, मूल येथे भेसळ तेलाचा साठा असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या पथकाला मिळाली. दरम्यान, मंगळवारी
या पथकाने जेठमल भंवरलाल सारडा
येथील खाद्यतेल रिपॅकर येथे धाड
टाकली. यावेळी विविध बँडचे नमुने
घेऊन १४ हजार २८ क्विंटल तेलाचा
साठा जप्त केला. ही कारवाई
पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टिन
वापरल्याने व कमी दर्जाचे असल्याच्या
संशयावरून सहायक आयुक्त (अन्न)
प्रवीण उमप व गुप्त वार्ता अन्न सुरक्षा
अधिकारी ललित सोयाम व रावसाहेब
वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश
सातकर यांच्या चमूने केली.
तपासणी पथके गठित

दिवाळीत हॉटेल, उपहारगृहात मिठाई, पेढे व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने तपासणी पथके गठीत केली आहेत. कुठेही भेसळ खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा संशय असल्यास चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी केले आहे.

अन्न सुरक्षा विभागाने ग्राहकांना स्वस्त दरातील किंवा अनोळखी ब्रँडचे तेल खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments