जिल्हा परिषद क्षेत्रात उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता
प्रतिनिधी मूल; राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सुशी केलझर जिल्हा परिषद क्षेत्र नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत झाला आहे. यामुळे या क्षेत्रातुन अनेक मातब्बर राजकीय नेते निवडणुक लढण्यास इच्छुक असुन आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण निवडणुकीच्या कामाला लागलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण होवुन जवळजवळ साडेतिन ते चार वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. प्रशासकाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेचा कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या कारभारात पदाधिकाऱ्यांचा धाक असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या चार वर्षात प्रशासनात एकाधिकारशाही निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीचे बिगुल केव्हा वाजेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जाती महिलासाठी आरक्षीत आहे, निवडणुक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहिर केलेले आहे.
मूल तालुक्यातील सुशी केलझर जिल्हा परिषद क्षेत्र नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत आहे, या क्षेत्रातुन भाजपाचे सद्यस्थितीत पक्षाचे निष्ठावान काम करणारे एकमेव सक्रिय कार्यकर्ते उथळपेठ गावचे सरपंच गावपातळीवरील चांगला अभ्यास असणारे तथा सुधीरभाऊ यांचे खास विश्वासू बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणून फलिंद्र सातपुते, भेजगांव येथील सरपंच अखिलेश गांगरेडीवार, मूल पंचायत समिती माजी उपसभापती सुनील आयलनवार, जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या उमेदवारांत रस्सीखेच होण्याची दाट शक्यता असून पक्ष श्रेष्ठीकडे कुणाचे पारडे जड होते हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.
एवढेच नाही तर बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या नव्या आणि मोठ्या नेत्याची सुद्धा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉग्रेसकडुन याच क्षेत्रासाठी राजू कनमवार, किशोर घडसे, तसेच हसन वाढई अथवा वाढई सुपुत्र सौरभ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
केळझर पंचायत समिती गणातंही चुरस
केळझर पंचायत समिती गण हे अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत आहे तर केळझर पंचायत समिती गण हे नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षीत आहे. त्यामुळे पंचायत समितीचे आरक्षण बघता भाजपा,काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, वंचित, आदी पक्ष पक्ष उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या काही दिवसात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे







