Homeकृषीपरवानाधारक कृषि केंद्रातूनच, खत, बियाणे खरेदी करा

परवानाधारक कृषि केंद्रातूनच, खत, बियाणे खरेदी करा

प्रेसनोट

परवानाधारक कृषि केंद्रातूनच, खत, बियाणे खरेदी करा

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन; गैरप्रकाराची तक्रार करा

प्रतिनिधी मूल, लोकवाद ; शेतकऱ्यांनी खत, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते, वियाण्याच्या उत्पन्नासंबंधी मनघडण व खोटे दावे करून आमीष दाखविण्यात येते, बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासनमान्य दराचे अधिकृत बिल शेतकऱ्यास दिले जात नाही, बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो, अनाधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई चे हमी शासन व ग्राहक मंच सुद्धा घेऊ शकत नाही असे बियाणे बोगस व कायदेशीर असते.

शेतक-यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. यासाठी पक्क्या बिलाचाच आग्रह धरावा. विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पॉकोट सीलबंद, मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी.

… बियाण्याच्या उगवणक्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉकीट किंवा बँक खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी रासायनिक खत खरेदी करताना बंग वरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी. जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाणेची, खताची विक्री करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश 1983 व रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी बोगस बियाणे व खते विक्रीचा बाब निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे तालुका कृषी अधिकारी मांगी मुल कळविले असून शेतकरी बंधुना आवाहन केले आहे.

तालुका संस्कृती अधिकारी मुल, जि. चंद्रेपूर

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments