मूल बसस्थानकामधील तिसरा डोळा बंद
चोरीच्या घटनांत वाढ; महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
लोकवाद प्रतिनिधी, मुल, ता. ९ : येथील बसस्थानकामधील तिसरा डोळा बंद झाला आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने येथे प्रवाशांची मोठी गर्दी आहे. त्या गर्दीची फायदा उचलत चोरटे आपला हात साफ करीत आहेत. सोमवार आणि मंगळवारी सतत दोन दिवस दोन महिलांच्या गळयातील सोन्याची चैन लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तिसरा डोळा बंद असल्याने चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे.दरम्यान, चोरीच्या दोन्ही घटनांची तक्रार मूल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
प्रवाशांना वारंवार सूचना द्या
लग्न सराईचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी बसस्थानकामध्ये आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षामधून प्रवाशांना वारंवार सूचना देणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही प्रवेशद्वाराजवळील सीसीटिव्ही कॅमेरे, पॉर्किंग आणि बसस्थानकाच्या आतील भागात सीसीटिव्ही कॅमेरे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये बसस्थानकावर गर्दी राहत असल्याने प्रवाशांच्या हितासाठी तिसरा डोळयाची नजर आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. मात्र याकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, गोंडपिपरी,चामोर्शी, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी मार्गावरील मूल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. ऐन लग्नसराईचे दिवस असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी
मूल : लग्नसराईमुळे प्रवाशांनी बसस्थानक गजबजले आहे. परंतु, सीसीटिव्ही बंद असल्याने चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने प्रवाशांत भीती व्यक्त होत आहे.
बसस्थानकावर आहे. तिकिटामध्ये सवलत असल्याने मुख्यत्वे महिलांची मोठी गर्दी येथे आहे. त्याच संधीचा फायदा चोरटे उचलत आहे. बसमध्ये चढताना आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळयातील सोन्याची चैन लंपास करीत आहे. ५ आणि ६ मे रोजी सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत महिलांनी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचा तपास चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने मूल बसस्थानकामध्ये तपास केला असतात्यांना येथील सीसीटिव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आढळले. तिसरा डोळाच बंद असल्याने तपासामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा
चोरटयांना होत आहे. चोरी करून फरार होण्यात त्यांना यश मिळत आहे. चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







