Homeचंद्रपूरमूल न.प मार्फत विविध सेवा ऑनलाईन

मूल न.प मार्फत विविध सेवा ऑनलाईन

मूल न.प मार्फत विविध सेवा ऑनलाईन 

पात्र व्यति QR कोड स्कॅन करून घेऊ शकतात सुविधेचा लाभ

प्रतिनिधी मूल;   पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व विहित मुदतीत लोकसेवा देण्याकरिता नगर परिषद मुल मार्फत लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत विविध सेवा ऑनलाईन स्वरुपात देण्यात येत आहे.

मुल न.प. मार्फत मालमत्ता व पाणीपुरवठा संबंधित सेवा, विविध नाहरकत प्रमाणपत्रे, व्यापार, परवानगी, इतर विविध लोकसेवा इ. देण्यात येते. त्या अधिक सोपे आणि युजर फ्रेंडली पद्धतीने देण्यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आले आहे. यात RTS अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची सूची आहे. त्यावर पात्र व्यक्ती आपली नोंदणी करून सेवांसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे आपले न.प. च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तक्रारी नोंदवता येणार आहे. तसेच ALL in one Mobile application वर एका क्लिकने विविध सेवा मिळणार आहे. तसेच WhatsApp chatbot ची सुविधा देण्यात आली आहे. यामार्फत जन्म मृत्यू दाखले, होर्डिंग बॅनर, तक्रारी, पाणी कर, मालमत्ता कर, विविध परवानगी, नाहरकत प्रमाणपत्र बाबत घरबसल्या मोबाईलवरुन अर्ज करू शकतात. याबाबत नगर परिषद मुल मार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती गांधी चौक मुल येथे LED स्क्रीन वर प्रदर्शित करण्यात आले आहे. या सर्व सुविधेचा लाभ पात्र व्यति QR कोड स्कॅन करून घेऊ शकतात.
या सर्व सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संदीप दोडे, मुख्याधिकारी न.प. मुल यांनी केले आहे. नगर परिषद मूल

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments