महिला दिनानिमीत्य महिलांची आरोग्य तपासणी
जनरल मेडिकल प्रॉक्टिशनर असोसिएशनचा उपक्रम
मुल प्रतिनिधी लोकवाद: स्थानिक जनरल मेडिकल प्रॉक्टिशनर असोसिएशनच्या वतिने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मूल येथील आरोग्य भवनामध्ये शुक्रवारी महिलांची आरोग्य तपासणी, औषधोपचार व रक्त तपासणी करण्यात आले.
आरोग्य शिबीराला डॉ. प्रविणा वऱ्हाडे, डॉ. सुनिता गोंगले, डॉ. मनिषा शेंडे, डॉ. सुनिता लाकडे, डॉ. किशोरी दांडेकर, डॉ. सायली बोकारे रक्त तपासणी तंत्रज्ञ सुकेश मुस्तीलवार, विनोद गेडाम यांची उपस्थिती होती.
महिलांसाठी आयोजीत केलेल्या आरोग्य तपासणी, औषधोपचार व रक्त तपासणी शिबीरामध्ये 97 महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रविणा वऱ्हाडे, डॉ. सुनिता गोंगले, डॉ. मनिषा शेंडे, डॉ. सुनिता लाकडे, डॉ. किशोरी दांडेकर यांनी रूग्णाची तपासणी केली, तर दातांची तपासणी डॉ. सायली बोकारे यांनी केले. सदर शिबिरामध्ये सर्वच रुग्णांचे रक्त तपासणी सुकेश मुस्तीलवार, विनोद गेडाम यांनी केले. महिलांच्या आरोग्य शिबिराच्या यशस्वीयतेसाठी जनरल मेडिकल प्रॉक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.







