Homeचंद्रपूरदेवाडा बुज येथे स्वातंत्र्यवीर शाहिद बाबुराव पुलेशवर शेडमाके यांचा जयंती समारोह कार्यक्रमाचे...

देवाडा बुज येथे स्वातंत्र्यवीर शाहिद बाबुराव पुलेशवर शेडमाके यांचा जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन

 देवाडा बुज येथे स्वातंत्र्यवीर शाहिद बाबुराव पुलेशवर शेडमाके यांचा जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन

पोभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील देवाडा बुजरुक येथील बिरसा मुंडा चौकात दिनांक 12 मार्च रोजी नुकतेच शहीद क्रांतीविर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम आदीवासी सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊ शेडमाके यांच्या नेतृत्वात तसेच आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

बनकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा भाजपा कार्यकर्ते विनोद मारशेटीवर हे होते तर उदघाटन स्थानी गावच्या महिला सरपंच आशाताई तोडासे यांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक मंडोवगडे आदिवासी समाज अध्यक्ष बंडू तोडासे गुरुदास कुंभरे विमान गेडाम जगदीश मडावी अनिल शेडमाके सुरेश कोवे मिथुन कुंभरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अतुल मेश्राम इत्यादी मान्यवर व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वातंत्र्यवीर शाहिद बाबुराव पुलेशवर शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहिद विर बाबुराव पुलेशवर शेडमाके यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकुन त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा संघटक विकास शेडमाके यांनी केले तर आभार बंडु मेश्राम यांनी मानले होते यावेळी बहुतांशी आदिवासी महिला नागरिकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शविली होती.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments