माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी येसगावं, आज दिनांक २८ फेब्रुवारी रोज शुक्रवार ला माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा कांबळे तर विशेष अतिथी म्हणून शरद चंद्र पवार विद्यालय भेजगाव येथील मुख्याध्यापिका भारती मोटघरे, फिनिक्स अकाडॅमी अध्यक्ष नरेश कुमार बोरीकर चंद्रपूर, माउंट कॉन्व्हेन्ट मूल उपमुख्याध्यापकअशपाक सय्यद, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज माउंट कॉन्व्हेन्ट मुल दुष्यंत गणवीर सह आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रिय विज्ञान दिना निमित्त घेण्यात आलेल्या प्रदर्षणी मध्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञानचे महत्व पटवून दिले सोबतच नवीन तंत्रज्ञानाची मदत दिली सोबतच भारताला विकास करण्याची गरज असून देशात नव नवीन विज्ञान विकसित होणे गरजेचे असल्याचेही सांगितले.
यामध्ये नर्सरी पासून तर इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकल किंवा समूह मध्ये प्रतिकृती बनवून आपापल्या शोधाचे महत्त्व पटवून सांगितले. तर स्पर्धेचे परीक्षण दुष्यंत गणवीर , योगेश चौधरी , चैताली बावणे, ऐश्वर्या गणवीर यांनी केले.
कार्यक्रम चे संचालन जान्हवी वासेकर, संस्कृती गावतुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक अशपाक सय्यद यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विज्ञान शिक्षक अशपाक सय्यद , दुष्यंत गणवीर,चैताली बावणे, ऐश्वर्या गणवीर, पलक काळे ,सौरभ गेडाम व इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.







