सहयोग मल्टी स्टेट सोसायटीचा जिल्हा परिषद शाळेला सहयोग
प्रतिनिधि मुल, ‘हात मदतीचा पुढे करावा बंधुभाव मनी धरुनी….. क्षणात विरतील ढग दुःखाचे सुख जीवनात येईल फिरुनी’!
या युक्ती प्रमाणे मुल तालुक्यातील सहयोग संस्था सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमी. शाखा मुल च्या वतीने “मी समाजाचे काहीतरी देणे लागतो व ती माझी नैतिक जबाबदारी आहे या जाणिवेतून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी मदत व्हावी ही भावना मनात ठेवून प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुल येथील विद्यार्थ्यांना कपडे वाटपाचा स्त्युत्य उपक्रम राबविण्यात आला.
मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र,निवारा, आरोग्य, शिक्षण, अन यातील मूलभूत गरज म्हणजे वस्त्र नागरिकांचे कमी उत्पन्न सोबत शिक्षणाची चाहूल घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची त्यामुळे नवीन वस्त्रे घेऊन, घालून आनंद साजरा करता येत नाही याची जाण ठेऊन सहयोग बँकेच्या वतीने छोटीशी भेट शाळेला कपडे वाटप करून साजरा करण्यात आला. सहयोग बँकेच्या वतीने असेच छोटे मोठे उपक्रम अनेकदा राबविण्यात येतात.
त्यावेळी सहयोग संस्थेचे शाखा मुलचे सहायक व्यवस्थापक नरेश ब्राह्मणकर, सुबोध मेश्राम, प्रणय गोंगले, सुभांगणा ढेकाटे, रविंद्र गुरूनुले, अंजली गणवीर, मेघा खंडाळे, जितेंद्र गुरू, आशिष रामटेके, आदी सहयोग बँक कर्मचारी वृंद तथा शाळेच्या मुख्याध्यापिका रामटेके मॅडम, व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.







