गोंडपिपरी तालुक्यातील मतदारांचा कौल “निर्णायक”
महेंद्रसिंह चंदेल यांच्या भूमिकेकडे लक्ष
गोंडपिपरी :-
विधानसभेची निवडणूक रंगात आली आहे.राजुरा विधानसभेअंतर्गत गोंडपिपरी एका तर राजूरा,जिवती आणि कोरपणा हे तालुके दुसऱ्या टोकावर आहे.अश्यावेळी ६५ हजारांच्या वर मतदार असलेला गोंडपिपरी तालुका “निर्णायक” भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात आहे.यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील महेंद्रसिंह चंदेल यांची उमेदवारी प्रभावी ठरणार असल्याचे चित्र असतांना ऐणवेळी चंदेल यांनी रणांगणातून घेतलेली माघार मुसंडी मारण्यासाठी कुणाला “मदतगार” ठरणार,हे पाहणे औत्सूकतेचे असणार आहे.







