माना आदिम जमात मंडळाचा वंचित ला पाठींबा
चिमूर येथे पत्रकार परिषद
चिमूर :- ७४ चिमूर विधानसभा सार्वत्रिक निवणुक करिता वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अरविंद सांदेकर यांना माना आदिम जमात मंडळ मुंबई यांचा पांठीबा असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष वासुदेव धारणे व इतर पदाधिकारी यांनी चिमूर येथे शुक्रवार ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष दडमल, कार्याध्यक्ष नरेंद्र काकडे, संघटन सचिव मधुकर ढोक, माजी कार्याध्यक्ष दामोदर केदार, महिला समन्वय समीतीचे अध्यक्ष अल्का भरडे, रविशंकर चौधरी, योगेश गोन्नाडे, महिला समिती च्या कार्याध्यक्ष अल्का सांदेकर, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब़ागडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हा अध्यक्ष शुभम मंडपे व अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.







