तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला पूर्ण वेळ तालुका कृषी अधिकारी.
मुल प्रतिनिधी,
मुल येथील तालुका कृषी अधिकारी पदावर सुनील कारडवार रुजू झाले आहेत. त्यांनी नुकताच तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. मात्र पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने या कार्यालयातील कृषी संदर्भात शेतकऱ्यांचे अनेक कामे प्रलंबित होती.
ही बाब लक्षात घेता मुल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला पूर्ण वेळ तालुका कृषी अधिकारी पद मिळाल्याने कृषी संदर्भात अनेक कामे पूर्ण होणार आहेत. तालुक्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यात येईल असा आशावाद तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले







