Homeचंद्रपूरनारीशक्ती विधेयकावरून काँग्रेसवर हल्लाबोल; शिवसेना महिला आघाडीचे मुलमध्ये निषेध आंदोलन

नारीशक्ती विधेयकावरून काँग्रेसवर हल्लाबोल; शिवसेना महिला आघाडीचे मुलमध्ये निषेध आंदोलन

नारीशक्ती विधेयकावरून काँग्रेसवर हल्लाबोल; शिवसेना महिला आघाडीचे मुलमध्ये निषेध आंदोलन

मुल (जि. चंद्रपूर) : नारीशक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप करत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुल शहरात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. गांधी चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले. तसेच शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोप केला.
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारतीताई राखडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. “नारीशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनात बल्लारपूर विधानसभा प्रमुख शीतलताई वेलपुलवार, शहर प्रमुख विशाल नागुलवार, उपशहर प्रमुख संतोष इप्पलवार, संजय मारकवार, शुभम समर्थ यांच्यासह महिला आघाडीच्या रेखा शर्मा, रिता समर्थ आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे मुल शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नारीशक्ती वंदन विधेयकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments