मूल तालुका काँग्रेस कमेटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
मूल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मूल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्री संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात मुल शहरातील विविध विहारांना भेट देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. एकताताई समर्थ, उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार, सभापती प्रशांत भाऊ समर्थ, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष गुरुभाऊ गुरुनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, तालुका महिला अध्यक्षा रूपालीताई संतोषवार, महिला शहर अध्यक्ष तथा सभापती नलिनीताई आडपवार, खरेदी-विक्री सोसायटी अध्यक्ष घनश्याम भाऊ येणुरकर, उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार, शहर युवक अध्यक्ष मिथून पटवा उपस्थित होते.
तसेच सभापती विलास कागदेलवार, लिनाताई फुलझेले, उपसभापती समीक्षा कळस्कर, नगरसेवक नितीन गद्देवार, अतुल गोवर्धन, विवेक मुत्त्यालवर, अशोक येरमे, ऋतिक गोयल, तुकाराम गुरुनुले, गुलाब पठाण, सुशीला खोब्रागडे, काजल धारणे, उज्वला कामडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड खोब्रागडे, सुरेश फुलझले आदी उपस्थित होते.
याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सौ. चंदाताई कामडी, संदीप भाऊ कारमवार, गुरुदास चौधरी, भास्कर खोब्रागडे, सलीम कुरेशी, गणेश मेश्राम, अभि भीमणवार, कृष्णा बोरेवार, शामला बेलसरे, मैथिली हेडाऊ, समता बंसोड, भूमिका मडावी, रागिणी कोपुलवार यांनीही माल्यार्पण करून अभिवादन केले.
या जयंती कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांसह मुल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







