Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्कंडा देव शाखेकडून वारसदारास विम्याचा लाभ.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्कंडा देव शाखेकडून वारसदारास विम्याचा लाभ.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

मार्कंडा देव/चामोर्शी

चामोर्शी तालुक्यातील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्कंडा देव शाखेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एका वारसास २ लाख रुपयांचा विमा धनादेश वितरित करण्यात आला.

माहितीनुसार, सौ वंदना संदेश ठाकुर रा मोहूरली यांनी मार्कंडा देव शाखेतून वार्षिक केवळ ४३६ रुपयांचा प्रीमियम भरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेतली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर शाखेने तत्परतेने वारसांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सुपूर्द केला होता.

त्या अनुषंगाने दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी शाखा कार्यालयात त्यांच्या वारस पती संदेश ठाकुर यांना २ लाख रुपयांचा विमा धनादेश देण्यात आला.

यावेळी शाखा व्यवस्थापक निखिल एन. येणूकवार, लिपिक आर. वाय. म्हस्के तसेच एमएसआरएलएमचे प्रतिनिधी सविता चरडुके, ओमदेव रोहणकर, सौरभ गोहणे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी शाखा व्यवस्थापक निखिल येणूकवार यांनी अधिकाधिक ग्राहकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments