📰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मूल (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त मूल शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार-फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसर फुलांच्या सजावटीने नटलेला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहर प्रमुख बादल करपे तसेच आकाश कावळे, राकेश मोहुर्ले, चेतन घोनमोडे आणि स्वप्नील नागोशे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून समाजात समानता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.







