HomeBreaking Newsपेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 24 :  चंद्रपूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असून संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:

कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.

भीतीपोटी इंधन साठवण्याचा किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये.

पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर विश्वास ठेवावा.

अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.

शेवटी, नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments