HomeBreaking Newsपिकअपच्या धडकेत वॉकिंग करणाऱ्या युवकाचा मृत्यू

पिकअपच्या धडकेत वॉकिंग करणाऱ्या युवकाचा मृत्यू

पिकअपच्या धडकेत वॉकिंग करणाऱ्या युवकाचा मृत्यू

लोकवाद न्यूज नेटवर्क

मूल : बेंबाळ येथून चांदापूर फाट्याकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने वॉकिंग करणाऱ्या तीन युवकांना जोरदार धडक दिली. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना बुधवारी (दि. १८) रात्री ९:१५ वाजता घडली.

विवेक सुनील मुनगोलवार (२९, रा. चांदापूर) असे मृतकाचे नाव आहे. जखमी धीरज दिलीप पाल (२५) व जगदीश विलास पोटे (२७, रा. चांदापूर) यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चांदापूर येथील चार युवक सायंकाळी जेवण झाल्यावर वॉकिंगसाठी निघाले. दरम्यान बेंबाळवरून चंद्रपूर फाट्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० बीएल ७८१३ क्रमांकाच्या पिकअपने तीन युवकांना जोरदार धडक दिली. या घटनेत विवेक मुनगोलवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला.

धीरज दिलीप पाल व जगदीश विलास पोटे हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवेक मुनगोलवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments