Homeगडचिरोलीगडचिरोली माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयातील अनियमिततेची चौकशी करा- माजी शिक्षक आमदार...

गडचिरोली माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयातील अनियमिततेची चौकशी करा- माजी शिक्षक आमदार राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली:-
जि.प. गडचिरोली शिक्षणाधिकारी (माध्य.)यांचे कार्यालयात प्रचंड प्रमाणात दुर्व्यवहार, गैरप्रकार व भ्रष्ट व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास येत असून या कार्यालयातील कामकाज कार्यालयीन वेळात न करता संध्याकाळी ६ नंतर रात्री उशिरापर्यंत केले जाते. अशा नियमबाह्य कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध तीव्र स्वरूपाचा असंतोष व खेद उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला आहे याबाबत अद्याप दखल घेतली नाही त्यासाठी या अनियमिततेची तात्काळ चौकशी करून संबंधिताविरूद्ध कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माजी शिक्षक आमदार राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केली आहे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हा अधिवेशनात रविवार . १५/०३/२०२६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, गडचिरोली येथील सभागृहात संपन्न झाले. या अधिवेशनात शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. गडचिरोली यांचे कार्यालयातील दुर्व्यवहार, अनियमितता व कामकाजाच्या वेळात कार्यालयात उपस्थित न राहता संध्याकाळी ६ नंतर कार्यालयात येऊन कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध तीव्र स्वरूपाचा असंतोष व खेद उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या असंतोषाची तात्काळ दखल घेऊन संबंधिताविरूद्ध अत्यंत कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करण्यास शासनाला व प्रशासनाला भाग पाडले जाईल अशी खात्री संघटनेच्यावतीने देण्यात आली.
शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. गडचिरोली यांचे कार्यालयात प्रचंड प्रमाणात दुर्व्यवहार, गैरप्रकार व भ्रष्ट व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास येते. या कार्यालयातील कामकाज कार्यालयीन वेळात न करता संध्याकाळी ६ नंतर रात्री उशिरापर्यंत केले जाते. गडचिरोली जिल्हयाची भौगोलिकस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता संध्याकाळी ६ नंतर कार्यालयीन कामाकरिता शिक्षक/कर्मचाऱ्यांना तात्कळत रहाणे अत्यंत जिकरीचे व धोक्याचे आहे. आपल्या जिवाचा धोका पत्करून अन्यायग्रस्त शिक्षक/कर्मचारी संध्याकाळी ६ नंतर सुद्धा कार्यालयामध्ये थांबतो आणि निराशा घेऊन हालअपेष्ठा सहन करत आपल्या घरी परत जातो. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण संचालक, पुणे यांनी दि. २५ जुलै २०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले. परंतु सदर आदेशानुसार शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला नाही, ही अत्यंत गंभीर स्वरूपाची प्रशासकीय बाब आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. गडचिरोली यांचे कार्यालयातील प्रशासकीय दुरावस्था व दुर्व्यवहार चिंताजनक असून अत्यंत निंदनीय आहे. याबाबत तात्काळ दखल घेऊन संबंधितांना वठणीवर आणणे अत्यावश्यक व निकडीचे आहे
शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. गडचिरोली यांचे कार्यालयातील दुर्व्यवहार व अनियमिततेची तात्काळ चौकशी करून संबंधिताविरूद्ध कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करावी. यासाठी ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२ तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा यांना माजी आमदार नागो पुं. गाणार यांनी निवेदन देऊन चेौकशी करण्याची मागणी केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments