HomeBreaking Newsगोंडपिपरी भाजप महिला मोर्चातर्फे महिला आरोग्य तपासणी शिबिर

गोंडपिपरी भाजप महिला मोर्चातर्फे महिला आरोग्य तपासणी शिबिर

गोंडपिपरी भाजप महिला मोर्चातर्फे महिला आरोग्य तपासणी शिबिर

गोंडपिपरी / प्रतिनिधी (लोकवाद)

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, तालुका गोंडपिपरी (ग्रामीण) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विठ्ठलवाडा येथे महिला आरोग्य तपासणी, निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये महिलांची बी.पी., शुगर, थायरॉईड, हिमोग्लोबिन, मासिक पाळी संदर्भातील आजार तसेच स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगासंदर्भात तपासणी व निदान करण्यात आले. या शिबिराचा लाभ एकूण १३८ महिलांनी घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर बोडलावर (माजी जिल्हा परिषद सदस्य) होते. प्रमुख अतिथी म्हणून वैष्णवी बोडलावर उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून पायल देवतळे, शैला चोपावार, संजना अमावर, मारोती अमावर, भास्कर गायकवाड, अस्मिता रापलवार, सुरेखा श्रीकोडावार, तेजस्विता भगत, सुरेखा पिपरे, कलावती पुप्पलवार उपस्थित होते.

शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभवी झाडे, प्राची वैद्य व मुरमुरवार मॅडम यांनी आरोग्य तपासणी करून महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मनिषा मडावी (नगरसेविका, नगर पंचायत गोंडपिपरी) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्वातीताई वडपल्लीवार (तालुकाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments