Homeगडचिरोलीआरमोरी मार्गावर अवजड ट्रकची C-60 जवानांच्या बुलेटप्रूफ वाहनाला धडक; जवानांचा जीव थोडक्यात...

आरमोरी मार्गावर अवजड ट्रकची C-60 जवानांच्या बुलेटप्रूफ वाहनाला धडक; जवानांचा जीव थोडक्यात बचावला

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली :
आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड ट्रकने C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने या अपघातात वाहनातील जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी C-60 पथकातील जवान सतत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र अलीकडील काळात रस्त्यांवर वाढलेल्या अवजड वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे या जवानांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात खनिज, लाकूड तसेच इतर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, वेगमर्यादेचे पालन न करणे तसेच वाहतुकीवरील अपुरे नियंत्रण यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे केवळ जवानच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सतत धोक्याचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने जड वाहतुकीवर योग्य नियंत्रण ठेवावे, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी तसेच संवेदनशील भागांमध्ये वाहतुकीसाठी विशेष नियम लागू करावेत, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. तसेच जवानांच्या सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षितता उपाययोजना व वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, विपुल येलटीवार उपस्थित होते

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments