🔍 लोकवाद उलगडा (भाग-2)
मूल तहसील कार्यालयात दुहेरी निकष? काहींना उपस्थितीची अट, काहींना मोकळीक
राजस्व अभियानात सुलभ सेवा म्हणे; शेतकऱ्यांना मात्र अडथळे?
दुर्योधन घोंगडे | लोकवाद
भोगवटा वर्ग-2 जमीन वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेत सातबारावरील सर्व धारकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या जात असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या प्रक्रियेत दुहेरी निकष लागू होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही शेतकऱ्यांच्या मते, त्यांच्या प्रकरणात सातबारावरील सर्व धारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले जात आहे. मात्र काही इतर प्रकरणांमध्ये अशी अट लावली जात नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे महसूल कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत नागरिकांना महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध महसूल सेवा जलद आणि पारदर्शक पद्धतीने देण्याचे शासनाचे धोरण आहे.
अशा परिस्थितीत भोगवटा वर्ग-2 ते वर्ग-1 प्रक्रियेत वेगवेगळ्या अटी लागू केल्या जात असल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा https://lokwad.in/?p=3034https://lokwad.in/?p=3034
(या प्रकरणाचा पुढील भाग उद्या लोकवादमध्ये…)







