शाळेत क्रिकेट खेळताना विद्यार्थ्यांना दिसला मृतदेह; मूल शहरात खळबळ
लोकवाद प्रतिनिधी, मूल :
मूल शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मराठी प्राथमिक शाळा, वार्ड क्रमांक ९ येथे विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळत असताना धक्कादायक घटना उघडकीस आली. खेळादरम्यान चेंडू भिंतीच्या मागे गेल्याने तो आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तेथे एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेली दिसली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी तात्काळ याची माहिती शिक्षकांना दिली.
शिक्षकांनी त्वरित मूल पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी व पोलीस कर्मचारी अमित कुमार आत्राम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.
मृत व्यक्तीची ओळख स्वप्नील छत्रुघ्न बिसेन (वय अंदाजे ३५ वर्षे) अशी झाली असून तो शाळेच्या मागील भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार तिसऱ्या मजल्यावरून उतरताना तो पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून घटनेचा पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.