चामोर्शी:- घोट केंद्राअंतर्गत असलेली राजे धर्मराव उच्च प्राथमिक शाळा, घोट ही शाळाआठ वर्षापूर्वी बंद करण्यात आली त्यामुळे तेथे कार्यरत शिक्षक एस. आर. झाडे यांच्यावर उपासमारीची पाळी आली तेव्हा शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार मा.नागो गाणार व विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांच्या पाठपुराव्याने न्यायालयातून न्याय मिळाला
घोट केंद्राअंतर्गत असलेली राजे धर्मराव उच्च प्राथमिक शाळा, घोट ही शाळा दि. 04/08/2018 रोजी बंद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित शिक्षक श्री. एस. आर. झाडे सर (सहाय्यक शिक्षक) यांचे दि. 07/08/2018 रोजी चापलवाडा केंद्र मक्केपल्ली येथे समायोजन करण्यात आले. यानंतर अनेक प्रशासकीय अडचणी व पेन्शन संदर्भातील प्रकरणासाठी झाडे सरांना न्यायालयीन लढा द्यावा लागला. या संपूर्ण प्रक्रियेत मा. संतोष सुरावार सर (विभाग कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभाग) यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. योग्य मार्गदर्शन करत सतत मदत केली. दरम्यान, दि. 27/03/2024 रोजी झाडे सरांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पेटतळा येथे समायोजन करण्यात आले. या समायोजनासाठीही सुरावार सरांनी विशेष मेहनत घेऊन प्रकरण मार्गी लावल्याचे सांगण्यात आले. पुढे झाडे सर हे दि. 31/05/2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पेटतळा येथून सेवानिवृत्त झाले. या प्रकरणात नागपूर येथील ॲड. प्रदीप शिरसागर सर यांनी विशेष लक्ष देत झाडे सरांना अवघ्या सात महिन्यांत न्याय मिळवून दिला. तसेच बाबासाहेब पवार (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) आणि विवेक नाकाडे (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक) यांनीही प्रकरण तातडीने निकाली निघण्यासाठी सहकार्य केले. झाडे सरांनी सांगितले की, “मा. सुरावार सर, माजी शिक्षक आमदार मा.नागो गाणार सर आणि संघटनेच्या पाठिंब्यामुळेच हा न्यायाचा लढा यशस्वी झाला. मी संघटनेचा मनापासून ऋणी आहे.” असे भावनिक शब्दांत . एस. आर. झाडे यांनी आभार व्यक्त केले.