Homeचंद्रपूरशहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते यांना...

शहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते यांना जनतेत पसंती

शहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते यांना जनतेत पसंती 

लोकवाद गौतम जीवने मूल : होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूल शहरात नव्या विचारांच्या नेतृत्वाबाबत मोठी चर्चा होताना दिसत आहे. नागरिकांच्या अपेक्षा आता केवळ विकासकामांपुरत्या मर्यादित न राहता, पारदर्शकता, प्रशासनातील संवेदनशीलता आणि सुशिक्षित या नेतृत्वाकडे झुकताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर शहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि समाजसेवेच्या क्षेत्रात ओळख निर्माण केलेल्या किरण कापगते या भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.शहरातील महिला आणि युवक वर्गात त्यांच्या नेतृत्वाविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. सुशिक्षित महिलांनी प्रशासनात सहभागी व्हावे, निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज वाढावा, ही लोकांची भावना असल्याचे दिसते.मूल शहराने मागील काही वर्षांत वेगाने विकास साधला असला तरी, प्रशासनिक कार्यपद्धतीत नव्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे, अशी जनमानसात चर्चा आहे. समाजाशी संवाद साधणारे, सर्वसमावेशक आणि उत्तरदायी नेतृत्व आजच्या काळाची गरज असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे.सद्यस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये सुशिक्षित नेतृत्वाच्या अपेक्षा अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत

शहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते यांना जनतेत पसंती

लोकवाद गौतम जीवने मूल : होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूल शहरात नव्या विचारांच्या नेतृत्वाबाबत मोठी चर्चा होताना दिसत आहे. नागरिकांच्या अपेक्षा आता केवळ विकासकामांपुरत्या मर्यादित न राहता, पारदर्शकता, प्रशासनातील संवेदनशीलता आणि सुशिक्षित या नेतृत्वाकडे झुकताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर शहरातील शिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या किरण किशोर कापगते या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि समाजसेवेच्या क्षेत्रात ओळख निर्माण केलेल्या किरण कापगते या भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.शहरातील महिला आणि युवक वर्गात त्यांच्या नेतृत्वाविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. सुशिक्षित महिलांनी प्रशासनात सहभागी व्हावे, निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज वाढावा, ही लोकांची भावना असल्याचे दिसते.मूल शहराने मागील काही वर्षांत वेगाने विकास साधला असला तरी, प्रशासनिक कार्यपद्धतीत नव्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे, अशी जनमानसात चर्चा आहे. समाजाशी संवाद साधणारे, सर्वसमावेशक आणि उत्तरदायी नेतृत्व आजच्या काळाची गरज असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे.सद्यस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये सुशिक्षित नेतृत्वाच्या अपेक्षा अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments