Homeकृषीमुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान...

मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी – ब.वि. संघटक नितीन येरोजवार यांची मागणी

मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी – ब.वि. संघटक नितीन येरोजवार यांची मागणी 

गौतम जीवने मूल ,; मुल तालुक्यात अकाली पावसाने भात, सोयाबीन तुळ, कापूस सारख्या आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून शेतकरी बांधवांना निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बल्लारपूर विधानसभा संघटक नितीन येरोजवार यांनी मुल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याप्रसंगी विधानसभा संघटक नितीन येरोजवार तालुका प्रमुख राज ठाकरे ,शहर प्रमुख बादल करपे ,उपतालुकाप्रमुख रवी शेरकी,सुशी सरपंच अनिल सोनुले,उपतालुकाप्रमुख संदीप निकुरे ,माजी तालुका प्रमुख सुनील काळे, महेश चौधरी, तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले,दिशांत पुण्यापवार सह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वतः शिवसेना कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून अनेक शेतकऱ्यांचे उभे व कापलेले पिक पाण्यात वाहत दिसले तर उभे धान जमीनदोस्त झालेले आहे. अनेकांचे कापूस व तूळ,सोयाबीन आदी महत्वाची पीकही अकाली पाण्याने पूर्णतः खराब झालेली आहे. याची दखल घेत शासनाने तत्काळ निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 पन्नास हजार रुपये मजुर करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा अशी मागणी सुधा निवेदनातून करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments